पुणे शहरात क्रिटिकल करोनारुग्ण वाढले

पुणे – गेल्या काही दिवसांपासून 400 च्या आत असलेली करोनाबाधित अत्यवस्थ रुग्णांची संख्या सोमवारी 422 झाली आहे. तर 255 रुग्ण व्हेन्टिलेटरवर उपचार घेत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांची संख्या वाढत असताना, सोमवारी मात्र 206 रुग्णांची नव्याने नोंद झाली. तर 2,196 नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

दिवसभरात 12 रुग्णांचा मृत्यू झाला. यातील तीन रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण बाधितांची संख्या आता 1 लाख 67 हजार 188 झाली आहे.

तर 1 लाख 57 हजार 836 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी 181 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या शहरातील एकूण ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या 4,917 आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.