जगातील सर्वात महागड्या कारचा मालक बनला रोनाल्डो; किंमत ऐकून थक्क व्हाल !

आघाडीचा फुटबॉलपट्टू आणि त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असलेला क्रिस्टियानो रोनाल्डो आता जगातील सर्वात महागड्या कारचा मालक बनला आहे.ही स्पोर्टस कार बुगाती कंपनीची आहे. कारचे नाव ‘ला वोइतूर नोइरे’ (La Voiture Noire) असे आहे. कारची किमंत 8.5 मिलियन यूरो म्हणजेच तब्बल 75 कोटी रूपये आहे.

पोर्तुगीज फुटबॉलपटू आणि इटालियन लीग सेरी ए मध्ये युव्हेंटसकडून खेळणारा रोनाल्डो याने स्वत: चा एक शर्टलेस फोटो या कारसह इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या कारसाठी रोनाल्डोला 2021 पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

बुगाती कंपनीच्या ‘ला वोइतूर नोइरे’ (La Voiture Noire) चा फ्रेंचमध्ये ‘काळी कार’ असा अर्थ होतो. ‘ला वोइतूर नोइरे’ कार ही आतापर्यंतची सर्वात महागडी स्पोर्टस कार आहे. शिरॉन स्पोर्ट कारमधीलच इंजिनच या कारमध्ये सुध्दा लावण्यात आले आहे. यात 8.0 लीटर क्वाड टर्बोचार्ज्ड डब्ल्यू 16 इंजिन दिले गेले आहे, जे 1500 पीएस पॉवर आणि 1600 एनएम टॉर्क देते. फक्त 2.4 सेकंदात ही कार 0 ते 60 किमी प्रतितास वेगाने वेगवान होऊ शकते. त्याचबरोबर, या कारचा सर्वोच्च वेग ताशी 380 किमी आहे. कारमध्ये हॅन्डक्राफ्टेड कार्बन फायबरचे बॉडीवर्क आहे.

भारतामध्ये या कारची वास्तविक किंमत सुमारे 87.6 कोटी रुपये आहे आणि कारवरील 45 कोटी टॅक्स पकडता आॅन रोड किमंत 133 कोटी रूपये इतकी होईल.

मागील वर्षी रोनाल्डोने  21.5 लाख पाउंड खर्च करून बुगाटी शिराॅन कार विकत घेतली होती. याव्यतिरिक्त त्याच्याकडे मर्सिडीज सी क्लास स्पोर्ट कूप, एस्टन मार्टिन, लैम्बोर्गिनी एवेंटाडोर एलपी700-4,  मैक्लॉरेन एमपी 412सी, बेंतले कॉटिनेंटल जीटीसी स्पीड, रोल्स रॉयस फैंटम और फरारी 599 जीटीओ सारख्या कार आहेत.

या कारपैकी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणार्‍या महेंद्रसिंग धोनी यांच्याकडे फरारी 599 जीटीओ कार आहे. फरारी  599 जीटीओमध्ये 6.0 लीटरचे व्ही 12 इंजिन दिले गेले आहे, जे 665 अश्वशक्ती (हाॅर्स पावर) आणि 20 एनएम टॉर्क देते आणि या गाडीचा सर्वोच्च वेग वेग 335 किमी/प्रतितास इतका आहे. या कारची किंमत 2.65 कोटी रूपय़े इतकी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.