सराईत गुन्हेगार कपाळ्या “एमपीडीए’ खाली स्थानबद्ध

तब्बल दहा गंभीर गुन्ह्यांची आहे नोंद 

पिंपरी: तब्बल दहा गंभीर गुन्ह्यांची नोंद असणारा सराईत गुन्हेगाराला पिंपरी पोलिसांनी एमपीडीए’ (झोपडपट्टी दादा विरोधी कायदा) खाली स्थानबद्ध केले आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई यांच्या आदेशावरून हि कारवाई करण्यात आली आहे.

आकाश ऊर्फ कपाळया राजू काळे (वय 27, रा. पत्राशेड झोपडपट्टी, लिंकरोड, चिंचवड) असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. दोन महिन्यांपूर्वी कपाळ्या याने दारू पिण्यासाठी आसपासच्या दुकानदारांकडे पैसे मागितले. मात्र दुकानदारानी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने हातात शस्त्र घेऊन काही दुकानांची तोडफोड करीत दहशत निर्माण केली होती.

तसेच कपाळ्या याच्यावर 2011 पासून २०१९ पर्यंत तब्बल 10 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये प्राणघातक हत्यारे बाळगणे, दुखापत करणे, टोळीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, तडीपारीच्या आदेशाचा भंग करणे, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे, खंडणी मागणे या गुन्ह्यांचा समावेश आहे.

त्याचा गुन्हयांचा चढता आलेख पाहून पोलीस आयुक्त बिष्णोई यांनी दिलेल्या निर्देषानुसार वरिष्ठ निरीक्षक भिमराव शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अभिजित जाधव, कर्मचारी जयवंत राऊत यांच्या पथकाने एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करून, सहायक आयुक्‍त रामचंद्र जाधव उपायुक्‍त स्मिता पाटील अतिरिक्‍त आयुक्‍त रामनाथ पोकळे मार्फतीने पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता. सदर प्रस्ताव त्रुटी विरहित तसेच परिपूर्णरित्या सादर करण्याची कामगीरी सहायक आयुक्‍त पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, श्रीराम पोळ पोलीस हवालदार सचिन चव्हाण यांनी केले आहे.

मामा गॅंगला मोक्‍काखाली अटक
चिंचवड परिसरात धुमाकूळ घातलेल्या मामा गॅंगवर पोलिसांनी यापूर्वीच संघटीत गुन्हेगारी विरोधी कायद्यान्वये कारवाई केली आहे. मात्र याची कुणकूण आरोपींना आधीच लागल्याने ते पसार झाले होते. या टोळीचा प्रमुख आकाश मामा उत्तम रंधवे (वय 25) याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. तर उर्वरिता आरोपी रफिक ऊर्फ काल्या शेख (वय 22), रमेश ऊर्फ अण्णा अहिवळे (वय 22, सर्व रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) यांना अटक करून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली असल्याची माहिती सहायक निरीक्षक अभिजित जाधव यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.