अमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा

मुरादाबादमधील एका इव्हेन्ट कंपनीने अभिनेत्री अमिषा पटेल आणि अन्य चौघांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी 18 नोव्हेंबरला एका इव्हेंटसाठी अमिषाला 11 लाख रुपये दिले गेले होते. ही रक्कम न्यू मॅक्‍स एन्टरटेनमेंट कंपनीच्या नावे दिली गेली होती.

एका क्‍लायंटच्या लग्नसमारंभा निमित्ताने अमिषाचा डान्स शो आयोजित करण्यात आला होता. मात्र लग्न समारंभाच्याच दिवशी अमिषा आणि तिच्या सहकाऱ्यांनी मुरादाबादमध्ये येऊन परफॉर्मन्स करायला नकार दिला आणि आणखी 2 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र ही जास्तीची रक्कम न मिळाल्याने अमिषा आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईला रवाना झाली होती. त्यामुळे इव्हेंट कंपनीला मोठे आर्थिक आणि मानसिक नुकसान सोसावे लागले होते.

या सर्व प्रकरणाची सिने मॅगझीनमधून खूप चर्चाही झाली होती. अमिषावर अनप्रोफेशनल असल्याची टीका सेलिब्रिटी विश्‍वातून झाली होती. अमिषाला पैसे परत मागितल्यावर इव्हेंट कंपनीच्या मालकाला ठार मारण्याचीही धमकी मिळाली होती. या सर्व प्रकरणी इव्हेंन्ट कंपनीच्या मालकाने अमिषा आणि अन्य चौघांच्या विरोधात फसवणूक आणि संबंधित गुन्ह्यांखाली खटला दाखल केला आहे. या खटल्याची सुनावणी 12 मार्च रोजी होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)