पुणे – एका सराईत गुन्हेगारास समर्थ पोलिसांनी पिस्तूलासह जेरबंद केले. ही कारवाई क्वार्टर गेट येथील एका गल्लीमध्ये रविवारी करण्यात आली. अनिकेत उर्फ पावन्या ज्ञानेश्वर काळे( 22,रा.नाना पेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार तपास पथक गस्त घालत असताना हवालदार सुशिल लोणकर, संतोष काळे , पोलीस शिपाई हेमंत पेरणे यांना काळे हा कंबरेला पिस्तूल खोचून एका गल्लीत थांबल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याने ट्रॅकपॅन्टमध्ये खोचलेले पिस्तूल आढळले.
सोबत एक काडतूसही होते. हा तीस हजाराचा शस्त्र साठा ताब्यात घेऊन त्याच्यावर आर्म ऍक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल मोहिते, पोलीस अंमलदार सुशिल लोणकर, संतोष काळे , सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, निलेश साबळे, सचिन पवार, सुमित खुट्टे, शुभम देसाई, सुभाष मोरे, शाम सुर्यवंशी, विठ्ठल चोरमोरे, प्रशांत सरक यांच्या पथकाने केली.