पुणे – सार्वजनिक ठिकाणी लोखंडी गुप्ती जवळ बाळगून थांबलेल्या एका सराईत गुन्हेगारास फरासखाना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातुन लोखंडी गुप्ती जप्त केली.
आकाश मंगेश सासवडे ( वय 21, रा. गणेश पेठ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री गणेश पेठेतील काशी विश्वेश्वर मंदिराजवळ एक तरुण दुचाकीवर थांबला असून त्याच्याकडे लोखंडी गुप्तीसारखे हत्यार असल्याची खबर फरासखाना पोलिसांना प्राप्त झाली होती.
त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडे असलेली लोखंडी गुप्ती जप्त केली. आरोपीविरुद्ध यापुर्वी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. संबंधीत गुन्ह्यात आरोपी दोन महिन्यांपासून फरार होता.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस अंमलदार वैभव स्वामी, सयाजी चव्हाण, सचिन सरपाले, अभिनय चौधरी, मोहन दळवी, ऋषीकेश दिघे, राकेश क्षीरसागर, मेहबुब मोकाशी, अमोल सरडे, महावीर वलटे, आकाश वाल्मीकी, महंमद हनीफ, शौकत शेख यांच्या पथकाने केली.