पुणे – मंचर येथे गोळीबार करून खून करणाऱ्या गुन्ह्यातील संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. मंचर पोलिस स्टेशनचे हद्दीत एकलहरे गावच्या हद्दीत ओंकार उर्फ राण्या बाणखेले याची डोक्यात पिस्टलने गोळी मारून हत्या केल्याप्रकरणी मंचर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल होती.
सदर प्रकार गंभीर असल्याने सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेबाबत पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी आदेश दिल्याने सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्याकडून समांतर तपास चालू होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा करून फरार असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना गुप्त बातमी द्वारा मार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी रामा जाधव हा राजगुरुनगर खेड येथे येणार आहे व नंतर पर राज्यात पळून जाणार आहे.
मिळालेल्या बातमीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे टीम ने खेड एसटी स्टँड येथून एक संशयित सुरेश जाधव, (22 वर्ष, रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे.) यास ताब्यात घेतले. त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी मंचर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.