निवृत्त फौजदारावर वार करुन लूटणारे जेरबंद

68 ठिकाणचे सीसीटीव्ही आणी 15 दिवस शोध

पुणे :- सेवानिवृत्त फौजदारावर वार करुन मोबाईल चोरणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून गुन्हयात वापरलेली ऍक्‍टीव्हा, कोयता आणी चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हयाचा छडा लावण्यासाठी शहरातील तब्बल 68 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यानंतर गाडी येरवडा परिसरातील असल्याचे कळाल्यावर गाडी मालकाचा शोध घेण्यासाठी पथक येरवडा परिसरात तब्बल 15 दिवस शोध घेत होते.

अश्‍पाक मोहंमद शेख(29,रा.अशोकनगर, येरवडा) सुशिल मुकुंद निकम(26,रा.गणेशनगर, येरवडा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील अश्‍पाक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सन 2016 पुर्वी जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी प्रकाश जयकुमार बुरले(58,रा.स्वारगेट पोलीस लाईन) हे सेवानिवृत्त सहायक पोलीस फौजदार आहेत. ते त्यांचा मित्र एमनाथ भोसले हे 25 ऑगस्ट रोजी रात्री घनशाम लॉजसमोरुन पायी घरी चालले होते. यावेळी ऍक्‍टीव्हावरुन आलेल्या आरोपींनी त्यांच्या खिशातील मोबाईल हिसकावला. बुरसे यांनी विरोध करताच आरोपींनी धारदार कोयत्याने त्यांच्या उजव्या हाताच्या पंजावर वार करुन पळ काढला.

 स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरांनी प्रतिकार करणाऱ्या एका तरुणाचा खून केला होता. हे गुन्हेगारही ऍक्‍टिव्हावरुनच आले होते. त्यांची मोडसही खडक पोलीसांनी अटक केलेल्या आरोपींसारखीच होती. त्यांचा या व इतर गुन्हयांशी काही संबंध आहे का ? हे पोलीस तपासून पहात आहेत.

गुन्हा दाखल झाल्यावर शोध घेत असताना पोलीस कर्मचारी समीर माळवदकर व बंटी कांबळे यांना हा गुन्हा सराईत गुन्हेगार अश्‍पाक शेख याने केल्याची खबर मिळाली. त्यानूसार अश्‍पाक आणी त्याच्या साथीदाराला ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये दोघांनी गुन्हा कबुल केला.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त मिलींद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, सहायक पोलीस निरीक्षक सुशिल बोबडे, उमाजी राठोड, पोलीस कर्मचारी अजीज बेग, विनोद जाधव, गणेश सातपुते, संदिप पाटील, सागर केकाण, समीर माळवदकर, बंटी कांबळे, राकेश क्षीरसागर, रवी लोखंडे, योगेश जाधव, इम्रान नदाफ यांच्या पथकाने केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.