तेलंगणा राज्यात एक लाखाचा ‘रिवॉर्ड’ असलेली टोळी ‘जेरबंद’

विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी : घरफोडीतील आरोपी

पुणे –  तेलंगना राज्यात एक लाखाचा रिवार्ड असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीस विश्रांतवाडी पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. विश्रांतवाडीत या टोळीने घरफोडी केली होती. त्यांच्या ताब्यातून 9 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हुसेश शिवाजी गायकवाड (45, रा. सोलापूर), आदर्श अरुण गायकवाड (24, रा. सोलापूर), लक्ष्मण गुरप्पा हेळवार (22, रा.कर्नाटक), राज दत्ता जाधव (26, रा. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांनी गुलबर्गा, सोलापूर व तेलंगना राज्यातील विविध ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. अशाप्रकारचे टोळीवर 30 ते 40 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपींनी 24 जानेवारी रोजी विश्रांतवाडी भागात घरफोडी करून 10 लाख 81 हजार 484 रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दाखल गुन्हात घटनास्थळावरील तांत्रिक बाबींचा अभ्यास करून तपास सुरू होता. तपासादरम्यान पांढऱ्या रंगाच्या एक्‍सयूव्ही कारमधून आरोपी येरवडा, हडपसरमार्गे सोलापूरकडे पळाल्याचे समोर आले होते.

गाडीच्या नंबरवरून तपास केला असता ही कार हुसेन गायकवाड याच्या नावे असून गायकवाड याच्यावर कर्नाटक व सोलापूर भागात 30 ते 40 चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस हवालदार दिपक चव्हाण व संदिप देवकते या दोघांनी आरोपींची माहिती काढली. त्यानंतर पथकाने सोलापूर जिल्ह्यातील हैद्रा येथे सापळा कारवाई करून संशयीत एक्‍सयुव्ही गाडी पकडली. यावेळी गाडीत लोखंडी कटावणी मिळून आल्याने गाडीमध्ये बसलेल्यांची चौकशी करण्यात आली.

ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त गलांडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय चांदखेडे, पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, सहायक पोलीस निरीक्षक एस.पी.यादव, तपास पथकाचे अधिकारी लहू सातपुते, पोलीस अंमलदार प्रफुल्ल मोरे, सतीश मुंडे, शेखर खराडे, यशवंत किर्वे, उत्तम गट, किशोर दुर्शिंग, अझरुद्दीन पठाण,, अनिकेत भिंगारे यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.