पुणे – भारती विद्यापीठ पोलीसांनी खूनाच्या घटनेतील वॉण्टेड आरोपीस अटक केली आहे. त्याने बांधकाम साईटवर दारु पिताना पुर्व वैमनस्यातून एकाचा खून केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दिनांक 18 मे रोजी सायंकाळी कात्रज – मांगडेवाडी कात्रज येथील नविन बांधकाम साईटवर मोहन संपत चौंडकर (रा. कात्रज, पुणे) यांस आरोपी विकास रमेश चव्हाण, सचिन डाकले आणि मधुकर तुपे यांनी जिवे ठार मारले होते. यानंतर आरोपी पळून गेलेले होते. त्यांच्याविरुध्द भारती विदयापीठ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हयाचा तपास चालु असाताना गुन्हयातील आरोपी विकास रमेश चव्हाण, सचिन डाकले यांना अटक करण्यात आली. मात्र गुन्हयातील आरोपी मधुकर बाळासाहेब तुपे, (रा.कात्रज कोंढवा रोड, विश्व जिम मागे, तुपे बंगला, कात्रज) हा फरार झालेला होता. त्याचा शोध घेत असताना तो कात्रज कोंढवा रोड येथील कात्रज स्मशानभुमी समोर पुलाखाली थांबलेला असल्याची खबर अंमलदार सर्फराज देशमुख व विक्रम सावंत यांना मिळली.
पोलीस उपनिरीक्ष नितीन शिंदे पथकासह तेथे दाखल झाले. पोलिसांना बघुन तो तेथुन पळुन जावु लागताच त्यास शिताफीने पकडले. गुन्हयामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला सदर गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव, पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रविन्द्र भोसले, संतोष भापकर, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, विक्रम सावंत, निलेश खोमणे, हर्षल शिंदे यांनी केली आहे.