पुणे – अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंग करुन पळुन गेलेल्या आरोपीस उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आले. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलिसांनी केली. आमित कुमार सुरज पाल (21 रा. भिलारीमा छिछनी जि. फत्तेहपुर राज्य उत्तर प्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो बांधकाम साईटवर मजुरी काम करत होता. त्याने एका अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तीच्यावर अतीप्रसंग केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार 2 जूलै रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पॉस्कोचा गुन्हा दाखल झाला होता. यातील आरोपी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर पळून गेला होता. तपास पथकातील अधिकारी वैभव पवार व तपास करीत असताना पोलीस अमंलदार प्रणव संकपाळ व शिवदत्त गायकवाड यांना दाखल गुन्हयातील आरोपी हा उत्तरप्रदेश मध्ये आहे अशी खबरी मिळाली. आरोपीचा शोध घेण्यासाठी त्यांचे पथक उत्तर प्रदेशात गेले. तेथून आमित कुमारला असोथर पोलीस स्टेशनाची मदत घेवुन जेरबंद केले. या गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मधुरा कोराणे करत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता पोलीस निरीक्षक, प्रकाश पासलकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस अमंलदार गणेश सुतार प्रणव संकपाळ, शिवदत्त गायकवाड, जगदीश खेडकर यांचे पथकाने केली