#Crime : वाहन चोरी करणारे राजस्थानमधले तीघे जेरबंद

चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत

पुणे – चंदननगर पोलिसांनी पुण्यात वाहन चोरी करणाऱ्या तीन राजस्थानी नागरिकांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याची किंमत 2 लाख 62 हजार इतकी आहे. खियालाल लालाराम मेघवाल(33), चुनाराम लालाराम मेघवाल(21), दिलखुश कुभाराम ठिंगला(19,रा.जोधपुर, राजस्थान) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार चंदननगर पोलीस ठाण्याचे तपास पथक वडगाव शेरी परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार तुषार भिवकर यांना खबर मिळाली होती. त्यानूसार चोरीची दुचाकी घेऊन तीन व्यक्ती वडगाव गावठाण येथे जाणार होते. खातरजमा केल्यानंतर सापळा रचण्यात आला. थोड्याच वेळात दुचाकीवरुन संशयीत आरोपी येताना दिसताच, त्यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांना पोलिशी खाक्‍या दाखवताच त्यांनी दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. त्यांच्या गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीती सहा व हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन चोरीची वाहने चोरल्याची कबुली दिली. ही सर्व वाहने जप्त करण्यात आली आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव, सहायक फौजदार पंडीत गावडे, मोहन वाळके, युसूफ पठाण, पोलीस अंमलदार, रोहिदास लवांडे, श्रीकांत गांगुर्डे, तुषार भिवरकर, महेश नाणेकर, अविनाश संकपाळ, अमित कांबळे, राहुल इंगळे, संदीप येळे, विक्रात सासवडकर, परशुराम शिरसाट, अमित जाधव, सुभाष आव्हाड, सचिन कोळी यांच्या पथकाने केली

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.