Crime | थेउरमध्ये जुगार अड्डयावर छापा, 14 जणांविरूद्ध गुन्हा

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

पुणे – शहरातील लोणी-काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दात थेऊरमध्ये बेकायदेशिर जुगार अड्डयावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. त्यानुसार जुगार अड्डा मालक  सागर प्रमोद राजगुरु (वय-२८   रा. थेऊर)  याच्यासह  १४ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार  लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कारवाईत ३५ हजारांचे जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे. थेउर परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशिररित्या जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती.  

त्यानुसार पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता शेडमध्ये कल्याण मटका आणि सोरट (पंती पाकुळी)  जुगार सुरू असल्याचे आढळुन आले. त्यानुसार १४ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,  सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण,  पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, हनमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण, संदिप कोळगे,  राजश्री मोहिते, अश्विनी केकाण यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.