सातारा (प्रतिनिधी) – येथील बोगदा परिसरातील आठ ते दहा मुलांनी रस्त्यावर येऊन वाढदिवस साजरा केल्याचे समोर आल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी संबंधित 15 मुलावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, बोगदा परिसरात राहणारा अनुराग चौगुले याचा रविवारी वाढदिवस होता. रात्री आठच्या सुमारास बोगद्यातील एका आंब्याच्या झाडाखाली मुलांनी वाढदिवस साजरा केला. याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोचले.
मात्र संबंधित युवक तेथून पसार झाले होते पोलिसांनी चौगुलेच्या घरी जाऊन खातरजमा केली असता त्याचा वाढदिवस असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 15 जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.