पुणे- पोलीस असल्याची बतावणी करून एस टी चालकाला पाटस टोल नाक्याजवळ थांबवून चार कुरियर प्रवाशांची १ कोटी ५५ लाखांची रोकड लुटणाऱ्या त्रिकुटाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली.
त्यांच्याकडून १ कोटी ५४ हजरांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रामदास भाऊसाहेब भोसले वय ३०, तुषार बबन तांबे वय २२, दोघेही रा. वरुडे, शिरूर आणि भरत शहाजी बांगर वय ३६ रा. गणेगाव खालसा, शिरूर
अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.