crime news : खून प्रकरणी दहा जणांना अटक

लोणी काळभोर -उरुळी कांचन येथील गारवा हॉटेलच्या मालकाचा खून करुन फरार झालेल्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने लातुर येथे सुमारे 10 किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

अटक आरोपींची संख्या दहा झाली आहे. याप्रकरणी 17 वर्षे 3 महिने वयाच्या अल्पवयीन मुलासह त्यांचा साथीदार निलेश आरते (वय 23, रा. तुकाईदर्शन, हडपसर, पुणे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

तर यापूर्वी बाळासाहेब खेडेकर (वय 56), निखिल खेडेकर (वय 24, दोघे रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन), निखिल चौधरी (वय 20), गणेश माने (वय 20, दोघे रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली), प्रथमेश कोलते (वय 23, रा. उरुळी कांचन),

अक्षय दाभाडे (वय 27, रा. सोरतापवाडी, ता. हवेली), करण खडसे (वय 21, रा. माकड वस्ती, सहजपुर, ता. दौंड) व सौरभ चौधरी (वय 21, रा. खेडेकर मळा, ता. हवेली) यांना अटक करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.