पुणे – दारू पिण्यासाठी दहा रुपये न दिल्याने तरुणाच्या गालावर ब्लेडने वार करण्यात आल्याची घटना येरवडा येथे घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अतुल बाळू सोनावणे (वय 27, रा.येरवडा) याला अटक केली आहे.
दीपक पांडुरंग सोनवणे (वय 32, रा. येरवडा) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. दीपक सोनवणे हे मजुरीचे काम करतात. ते रविवारी (ता.26) कामावरून घरी जात होते. त्यावेळी लक्ष्मीनगर येथील संतोष मित्र मंडळाजवळ अतुल सोनावणे याने फिर्यादीना अडवले. त्याने फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी दहा रुपये मागितले. त्यांनी नकार दिल्याने दीपकने त्यांच्या गालावर ब्लेडने वार करून जखमी केले.