पुणे – आर्म ऍक्टमधील आरोपीस पकडण्यास गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकास आरोपीही दोघांनी धक्का-बुक्की केली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन एकास अटक केली आहे. ही घटना शनिवारी दुपारी तुळापुर गायरान येथे घडली.
संपत बबन शिवले ( 41,रा.तुळापुर, हवेली) असे अटक आरोपीचे नाव आहे तर राम पोपट शिवले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आर्म ऍक्टमधील गुन्हेगार तेजस साळवे, चंद्रकांत शिवले आणि राम शिवले(रा.तुळापुर, ता. हवेली) यांचा शोध घेण्यासाठी लोणीकंद पोलीस ठाण्याचे पथक तुळापुर येथे गेले होते.
त्यांना पथक चौकशीसाठी ताब्यात घेऊन विचारपूस करत होते. यावेळी त्यांच्या भावकितील संपत शिवले तेथे आला. त्याने इथ शहाणपणा करायचा नाही, तु कोण , तुझा काय संबंध असे म्हणत पथकाच्या अंगावर धावून आला. यानंतर पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर धाऊन आला.
पोलीस उपनिरीक्षकाने त्यांना सरकारी कामात अडथळा आणू नका आम्हाला सहकार्य करा असे सांगितले. दरम्यान दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यास पकडून मागे ओढळे तरी शिवीगाळ करत , धमकी देऊन एका आरोपीस पळून जाण्यास मदत केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.