तरुणीचा विनयभंग करणारा अटकेत

पिंपरी – भांडणात तरुणीचा ड्रेस फाडून विनयभंग कारणाऱ्याला भोसरी पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी (दि.5) दुपारी अडीचच्या सुमारास कासारवाडी परिसरात ही घटना घडली.

याप्रकरणी एका 25 वर्षीय पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, सचिन शिवाजी लांडगे (रा. कासारवाडी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी लांडगे याने शुक्रवारी दुपारी फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा वाजवून घरात जबरदस्तीने प्रवेश केला.

फिर्यादी यांना शिवीगाळ करून संपूर्ण कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांचा ड्रेस फाडून लगट करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी तातडीने आरोपीवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर तातडीने कारवाई करत आरोपीला शोधून गजाआडही केले. आता याप्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.