crime news : स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा खून

पुणे – स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा मैत्रिणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रक रणी मैत्रिणी विरोधात हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सोनल पुरूषोत्तम दाभाडे (वय ३४, सध्या रा. हिंद कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रोहिणी रामदास युनाते (वय २४) हिला अटक करण्यात आली. दाभाडेचा भाऊ निवास (वय ३०, रा. घोटा, जि. अमरावती)

याने यासंदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनल आणि रोहिणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. गेल्या तीन वर्षांपासून दोघेजण एकत्र राहत होते. किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद व्हायचे.

२९ ऑगस्ट रोजी दोघांची भांडणे झाली. रोहिणीने सोनलला ढकलले. त्याचे डोके भिंतीवर आपटल्याने त्याची शुद्ध हरपली. त्यानंतर तिने सोनलचा गळा आवळून खून केला. दरम्यान, रोहिणीने पोलिसांना त्याच्या मृत्यूबाबतची माहिती दिली आणि त्याचा अकस्मात मृत्यू झाल्याचे सांगितले.

या प्रकरणी सुरूवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. दाभाडेच्या नातेवाईकांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. शवविच्छेदन अहवाल आणि तपासात मिळालेल्या माहितीनुसार तिने सोनलचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.