crime news । मोक्काच्या गुन्हयातील आरोपी हैद्राबाद येथून अटक

पुणे – मोक्काच्या गुन्हयात वॉन्टेड असलेला सराईत गुन्हेगार व टोळी प्रमुखास हैद्राबाद येथून अटक करण्यात आली. सूरज अशोक ठोंबरे (रा. धनगरवाडा , नानापेठ पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने नानापेठेतील आंदेकर टोळी विरोधात तरुणांना एकत्रित करुन स्वतःची संघटित गुन्हेगारी टोळी तयार केलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार त्याचे टोळीतील सदस्य किरकोळ व्यापारी लोकांकडून शस्त्रांचा धाक दाखवून हप्ते वसुलीकरीत असतात. आंदेकर टोळीवर वर्चस्व गाजविणेसाठी सूरज ठोंबरे व त्याचा सहकारी सोमनाथ गायकवाड यांनी

आपसात मिळून आंदेकर टोळीतील नवीन सदस्य असलेला सोळा वर्षाचे युवकावर दि 23 जानेवार रोजी टोळीतील सहकारी यांचे करवी हल्ला करुन त्याचा खून करणेचा प्रयत्न केला होता.

यासंदर्भात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासा दरम्यान सूरज ठोंबरे याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असून सदरचा गुन्हा त्यांनी गुन्हेगारी स्वरुपाचा कट करुन केला असल्याचे आढळून आले. यामुळे गुन्हयाचा मोका कलमाचा समावेश करण्यात आला होता.

गुन्हयाचा तपास सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर( फरासखानाविभाग) यांचेकडे देण्यात आला होता .या गुन्हयाचे तपासात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्हा दाखल झाल्यापासून टोळी प्रमुख व मुख्य आरोपी सूरज ठोंबरे,

त्याचे सहकारी आकाश सासवडे व शुभम पवळे फरारी होते त्याचे शोधासाठी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे आणि पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांचे मार्गदर्शनानुसार विशेष पथक स्थापन केलेले होते.

या पथकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, उपनिरीक्षक विशाल मोहिते , सहायक पोलीस फौजदार भालेराव , पोलीस अंमलदार शाम सुर्यवंशी, मेहबुब मोकाशी, मल्लीकाजुर्न स्वामी, तुषार खडके, अमेय रसाळ, सागर केकाण यांचा समावेश केलेला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.