पुणे : मेडीकल व्यावसायिकाने औषध उधारीवर न दिल्याने ग्राहकाने चाकूने डोक्यात आणि हातावर वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी मनोज सुदाम अडागळे (वय ४० रा फुरसुंगी, हडपसर) याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत वैभव तुकाराम मखरे (वय २६, रा फुरसुंगी, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मंगळवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास खंडोबा माळ फुरसुंगी हडपसर येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी वैभव मखरे यांचे खंडोबा माळ फुरसुंगी येथे शिवश्री मेडिकल आहे. फिर्यादी मखरे हे मेडिकल मध्ये असतांना आरोपी अडागळे आला आणि त्याने औषध उधारीवर पाहिजे असल्याचे संागितले.
आमच्या दुकाना उधारिवर औषधे देत नसल्याचे मखरे यांनी सांगितले. याचा राग अल्याने आरोपी अडागळे याने मारहाण करत भाजी कापायचा चाकूने फिर्यादी मखरे यांच्या डोक्यावर व हातावर वार करुन जखमीकरुन मेडिकल मधील सामानाचे नुकसान केलेे.
फिर्यादी मखरे यांच्या जखमेतुन रक्त निघालेले पाहताच आरोपी अडागळे पळाला. हडपर पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस अंमलदार टिळेकर करत आहेत.