crime news : प्रेम संबंधात वाद; चारित्र्यावर संशय घेत प्रेयेसीचा प्रियकराकडून खून

पुणे – प्रेमसंबंध असताना प्रेयेसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा प्रियकराने पाेटात चाकू भाेकसून खून केल्याची घटना पुण्यातील भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्याचे हद्दीत रविवारी रात्री दहा वाजण्याचे सुमारास घडली. सपना दिलीप पाटील (वय-३२,रा.धनकवडी,पुणे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव अाहे. याप्रकरणी तिचा प्रियकर राम गिरी (वय-३५,मु.रा.परभणी) यास पाेलीसांनी ताब्यात घेतले अाहे.

याबाबत भारती विद्यापीठ पाेलीसांकडे संजीवनी दत्ता देवकर (वय-२९) हिने पाेलीसांकडे फिर्याद दिली अाहे. संजीवनी देवकर अाणि सपना पाटील या रिलायन्स मार्टमध्ये हाऊस किंपिंगचे काम करत हाेत्या तसेच धनकवडीतील बालाजीनगर परिसरात राहण्यास अाहे. रविवारी रात्री साडेअाठ वाजण्याचे सुमारास सपना अाणि राम गिरी हे दाेघे जेवणाकरिता हाॅटेल मध्ये गेले हाेते. जेवण केल्यानंतर ते रात्री दहा वाजण्याचे सुमारास दुचाकीवरुन घरी परतत असताना, पुण्याकडून  साताराकडे जाणारे नवीन कात्रज बाेगद्याच्या सुरुवातीस काेळेवाडी येथे राम गिरी याने गाडी थांबवून सपनाच्या पाेटात  चाकूने भाेकसून तीचा निघृण खून केला. त्यानंतर अाराेपी पसार झाला हाेता.

खुनाची माहिती मिळताच, परिमंडळ दाेनचे पाेलीस उपअायुक्त सागर पाटील, सहाय्यक पाेलीस अायुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पाेलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पाेलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक यांनी घटनास्थळी भेट दिली व अाराेपीचा शाेध सुरु केला.

तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने अाराेपीचा माग काढून त्यास ताब्यात घेण्यात अाले असून खुनातील चाकून जप्त करण्यात अाल्याची माहिती भारती विद्यापीठ पाेलीसांनी दिली अाहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पाेलीस निरीक्षक अशिष कवठेकर करत अाहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.