कामशेत : साई गावात महिलेचा विनयभंग

कामशेत – नाणे मावळातील साई गावामध्ये कपड्याला इस्त्री करण्याच्या बहाण्याने घरात घुसून महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी साई गावातील एका महिलेने फिर्याद दिली आहे. याबाबत रामदास डेनकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 3) सकाळी साडेदहाच्या सुमारास नाणे मावळमधील साई गावात फिर्यादी महिला घरात कपड्यांना इस्त्री करीत असताना आरोपी रामदास डेनकर याने फिर्यादीचे पती घरी आहे का अशी विचारणा करीत घरात प्रवेश केला. माझे दोन शर्ट इस्त्री करता का असा बहाणा केला. त्यानंतर घरात घुसून फिर्यादीचा विनयभंग केला. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.