Govind Kedia Arrest । अंमलबजावणी संचालनालयाने महादेव ऑनलाइन बेटिंग प्रकरणाचा मनी लाँड्रिंग अँगलचा तपास करत असताना मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी प्रमुख स्टॉक पोर्टफोलिओ ब्रोकर गोविंद केडिया याला ईडीने अटक केली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, ” तपासादरम्यान काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे ज्यावरून असे दिसून आले आहे की केडिया स्टॉक मार्केटमध्ये बेकायदेशीर पैसे गुंतवत होते जे महादेव बेटिंग ॲपशी जोडलेले होते.” दरम्यान, केडियाची स्टॉक पोर्टफोलिओ मॅनेजमेंट फर्म असून त्यांना कोलकातामधून अटक करण्यात आली.
गोविंद केडिया यांना रायपूर येथील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. ज्याठिकाणी ईडीने त्यांच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने केडिया यांना ५ दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिलेत. ईडीच्या म्हणण्यानुसार केडिया महादेव बेटिंग ॲपच्या प्रवर्तकांपैकी एक होते आणि विकास छापरिया हा यातील प्रमुख आरोपी आहे. केडिया यांचे त्यांच्याशी जवळचे संबंध होते.
ईडीने केला ‘हा’ मोठा दावा Govind Kedia Arrest ।
केडिया आणि छापरिया यांनी मिळून सट्टेबाजीच्या माध्यमातून मिळालेला पैसा भारतीय शेअर बाजारात गुंतवला, असा ईडीचा दावा आहे. केडियावर परफेक्ट प्लॅन इन्व्हेस्टमेंट एलएलपी, एक्झिम जनरल ट्रेडिंग एफझेडसीओ आणि टेकप्रो आयटी सोल्युशन्स सारख्या संस्थांद्वारे गुंतवणूक सुलभ केल्याचा आरोप आहे. यासोबतच या अवैध निधीचा मार्ग लपवण्यासाठी फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट (FPI) चा मार्ग वापरण्यात आल्याचा आरोप आहे.
160 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त Govind Kedia Arrest ।
केडिया यांच्या डिमॅट होल्डिंगमध्ये सापडलेल्या 160 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. गेल्या वर्षी, केडियाच्या परिसराची झडती घेताना, ईडीने 18 लाख रुपयांचे भारतीय चलन आणि 13 कोटी रुपयांचे सोने आणि दागिने जप्त केले होते. याशिवाय केडिया हे टेकप्रो आयटी सोल्युशन्स लिमिटेडचे प्रमुख शेअरहोल्डर नितीन टिब्रेवाल यांच्याशी संबंधित असल्याचेही तपासात समोर आले आहे. महादेव ऑनलाइन सट्टेबाजीसाठी कंपनीचा वापर करून विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीच्या माध्यमातून अवैध पैसे शेअर बाजारात गुंतवल्याचा तिब्रेवालवर आरोप आहे.
काळ्या पैशाचे पांढऱ्या पैशात रूपांतर करण्यात केडिया यांची भूमिका
तिब्रेवालने बेकायदेशीर सट्टेबाजीतून कमावलेल्या पैशाचे शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून पांढऱ्या पैशात रूपांतर केल्याचेही ईडीचे म्हणणे आहे. या प्रक्रियेत केडिया यांची महत्त्वाची भूमिका होती. ईडीचा दावा आहे की केडियाने टिब्रेवालच्या मदतीने हे मनी लॉन्ड्रिंग नेटवर्क मजबूत केले आणि अवैध पैशाचे कायदेशीर पांढरे केले.