पुणे- विवाहितेला “अंगाला उंदीर मेल्याचा वास येतो’ असे म्हणत सातत्याने छळ करणाऱ्या सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे आणी नणंदेवर हा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी 39 महिला पतीसह रुणवाल पार्क येथे रहाते. तीचा 2002 मध्ये अशोक सुर्यकांत बाठे(44,रा.कल्याण) याच्याबरोबर विवाह झाला होता. विवाहानंतर सासरचे नेहमी तु रंगाने काळी आहेस, तुझ्यामुळे आमचे वाटोळे झाले, तुझ्या अंगाला उंदीर मेल्याचा वास येतो असे म्हणन मानसिक व शारीरीक छळ करत होते. तीला शिवीगाळ करुन मारहाण करण्याबरोबरच व्यवसायासाठी वडिलांकडून दिड लाख रुपयांची रक्कम आणण्यास भाग पाडले होते. सतत मानसिक व शारिरीक छळ केल्याने तीने तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक खटके करत आहेत.