crime news : शिक्रापूरात जुन्या वादातून भावांना मारहाण

शिक्रापूर -जुन्या भांडणाच्या वादातून आठ जणांच्या टोळक्‍याने दोघा भावांना शिवीगाळ, दमदाटी करत काठीने मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. 

याप्रकरणी आठ जणांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याबाबत आकाश रोहिदास जाधव (वय 27, रा. बाजार मैदान जवळ, शिक्रापूर) यांनी फिर्याद दिली. 

त्यानुसार तेजस रमेश चव्हाण, विनय हरिभाऊ चव्हाण, शुभम भूकणे, शुभम राऊत, शुभम बाळासाहेब चव्हाण, सोन्या गायकवाड, मोन्या गायकवाड, महेश आढाव (सर्व रा. शिक्रापूर) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. 

आकाश जाधव हा घरामध्ये असताना त्याला घराबाहेर काही युवकांच्या भांडणाचा आवाज आल्याने त्याने घरातून बाहेर येऊन पाहिले असता त्याला घराच्या बाहेर उभ्या असलेला त्याचा

भाऊ राजेश याला काहीजण जुन्या भांडणाच्या वादातून मारहाण करत असल्याचे दिसले. आकाश भांडणे सोडविण्यासाठी गेला असता युवकांनी त्याला देखील मारहाण केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.