पिंपरी – घरगुती वादातून चुलत भावाने लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करत खुनीहल्ला केला. यामध्ये चुलत भाऊ गंभीर जखमी झाला आहे. पिंपरी, रिव्हर रोड येथे गुरुवारी (दि. 26) सायंकाळी ही घटना घडली.
खंडू बबन शिरसाठ (वय 43, रा. नढेनगर, काळेवाडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांचा चुलत भाऊ गणेश मदन शिरसाठ (वय 36, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी खंडू शिरसाठ आणि त्यांचा चुलत भाऊ आरोपी गणेश शिरसाठ यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून गणेश याने फिर्यादी यांच्यावर लोखंडी रॉडने खुनी हल्ला केला. यामध्ये फिर्यादी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. फिर्यादी खंडू शिरसाठ हे शिवसेनेचे विभाग संघटक आहेत.