लेडीज होस्टेलमधील तरूणीचा विनयभंग

पिंपरी – जेवण करून हॉस्टेलच्या रूमवर परत जाणाऱ्या तरूणीचा हात पकडून विनयभंग करणाऱ्या आणि धमकी देणाऱ्या तरुणाविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना भोसरी येथे मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. गणेश जाधव असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणी जेवण करुन हॉस्टेलला परतत असताना आरोपी गणेश जाधव याने फिर्यादी तरुणी यांचा हात पकडून जबरदस्तीने टेरेसजवळ नेले आणि विनयभंग केला, तसेच बघून घेण्याची धमकी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.