पिंपरी – कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री आठच्या सुमारास पिंपळे निलख परिसरात ही घटना घडली असून आरोपीला अटक करण्यात आले आहे. याप्रकरणी 13 वर्षीय अल्पवयीन मुलीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार सागर रमेश सरोदे (वय 26, रा. पिंपळे निलख) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी ही बुधवारी रात्री क्लासला जात असताना आरोपी सागर याने पाठलाग करून तिला अडवले. तिचा हात पकडून विनयभंग केला. तसेच आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेचे वडीलांना शिवीगाळ केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक चैत्राली गवळी अधिक तपास करीत आहेत.