पोलिसांत तक्रार; तरुणावर हल्ला

पिंपरी -पोलिसात तक्रार का दिली, असे म्हणत तरुणावर सत्तूरने वार करण्यात आले. ही घटना वाकड येथे घडली. पुनीतकुमार विवेक शेट्टी (वय 28, रा. मरकळ रोड, आळंदी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विजय माणिक गायकवाड (रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी शेट्टी आणि आरोपी गायकवाड यांच्यात पूर्वीपासून भांडण आहे. या भांडणाचा राग मनात धरून तू पोलिसात तक्रार का दिली, अशी विचारणा करीत आरोपी गायकवाड याने शेट्टी यांच्यावर सत्तूरने वार करीत गंभीर जखमी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.