चाकूचा धाक दाखवून मोबाईल पळवला

पिंपरी  -चाकूचा धाक दाखवून तरुणाचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावून घेतला आहे. ही घटना रविवारी (दि.24) रात्री घडली. याप्रकरणी संग्राम हरी आबगे (वय-23 रा. तळेगाव चौक, चाकण) यांनी दोन अज्ञात दुचाकीस्वारांविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्राम हा देहु-आळंदी रोडने मोबाईल पाहत पायी जात असताना आरोपी दुचाकीवरून आले व त्यांनी संग्राम यांच्या हातातील मोबाईल हिसकावला. संग्राम याने त्यांचा पाठलाग केला असता, दुचाकीवरून एकाने चाकूचा धाक दाखवला व ते पसार झाले. याचाप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.