रिक्षा पळविणाऱ्या आरोपीला अटक

पिंपरी -भाडे तत्वावर रिक्षा घेऊन एटीएम मधून पैसे घेऊन येतो म्हणून रिक्षा घेऊन रिक्षा चालका समोरून पसार झालेल्या आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

बालाजी विनायक मोगली (वय-19 रा. भोसरी) याने फिर्याद दिली असून नवनाथ हनुमंत शितोळे (वय-28 रा. बोपखेल) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजीकडून नवनाथ याने भाडे तत्वावर रिक्षा केली. त्यानंतर तो जेवणासाठी हॉटेलमध्ये गेला. तेथे जेवणाचे पैसे भरण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून त्याने एटीएममधून पैसे आनण्यासाठी रिक्षा घेतली.

हा प्रकार गुरुवारी (दि.21) रात्री दीडच्या सुमारास घडला. मात्र तो रिक्षा घेऊन पसार झाला. त्यानंतर बालाजीने रविवारी (दि.24) याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नवनाथला अटक केली असून वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.