महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पिंपरी -पायी जात असताना पिंपळे गुरव येथे 47 वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली असून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. मंदाकिनी अशोक भालकर (वय-47, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली असून दोन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या घरी पायी जात असताना दोन चोर दुचाकीवरून आले व त्यांनी महिलेच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. यावरून सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.