दारु पिऊन पत्नीचा छळ, पतीच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी – दारु पिऊन येऊन पत्नीला शिवीगाळ मारहाण करणाऱ्या दारुड्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आतंरजातीय विवाह झाला असल्याने सुनेला जातिवाचक अपमानास्पद बोलून डांबून ठेवणाऱ्या सासूविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन, किरण भिमराव यादव (वय-29), सासू अलका भिमराव यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा 2018 साली आरोपी किरण याच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह झाला आहे. लग्न झाल्यापासून आरोपी नेहमीच दारु पिऊन घरी येवून शिवीगाळ व मारहाण करत असते. तसेच तिच्या सासूने जातीवाचक बोलून अपमान केला व घरात डांबून ठेऊन शारीरिक व मानसिक त्रास दिला. याप्रकरणी अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.