पिंपरी – अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन विनयभंग केल्याची घटना दि. 30 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजमाच्या सुमारास निगडी येथील क्रांतीनगर येथे घडली. याप्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अल्ताफ शेख (वय 25, रा. आकुर्डी) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 30 मे) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी तरुणी ही आकुर्डी भाजी मंडई येथे भाजी खरेदी करण्यासाठी गेली होती. भाजी खरेदी करुन ती घरी परतत असताना आरोपी अल्ताफ शेख याने तिचा पाठलाग करुन हात पकडत विनयभंग केला. यापूर्वी देखील अल्ताफ याने तरुणीचा पाठलाग केला होता. यामुळे दोन्ही परिवारात वाद झाले होते. याप्रकरणी अल्ताफ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.