पिंपरी – ऑर्डरला देवूनही उशीर का लागला असे विचारणाऱ्या वृद्ध ग्राहकाला वेटरने मारहाण केली. यामध्ये वृद्धाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. 1) सकाळी साडेदहाच्या सुमारास निगडी येथील हॉटेल स्वागत ट्रान्सपोर्टनगर येथे घडली. अशोक गोपाळराव पवार (वय-60, रा. नवल हौसिंग सोसायटी, यमुनानगर, निगडी) असे जखमी वृद्धाचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वेटर अफ्रिदी शेख उर्फ अस्मान (रा. हॉटेल स्वागत, ट्रान्सपोर्टनगर निगडी, मुळ रा. कोलकत्ता पश्चिम बंगाल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक पवार हे हॉटेल स्वागतमध्ये नाष्टा करण्यासाठी गेले होते. त्यांनी अस्मान याला नाष्ट्याची ऑर्डर दिली. नाष्ट्याची ऑडर देण्यास विलंब झाल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अस्मान याने अशोक यांना शिवीगाळ करुन डोळ्यावर बुक्की मारली. यामध्ये अशोक यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे.