रिक्षाचालकाला लाकडी दांडक्‍याने मारहाण

पिंपरी – तिघांनी मिळून एका रिक्षा चालकाला लाकडी दांडके व दगडाने मारहाण करुन जखमी केले. ही घटना वाकड येथील ब्रिजखाली शुक्रवार दि. 31 मे रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

अल्लाउद्दीन साहेबलाल शेख (वय-31, पाटणेचाळ, कासारवाडी) असे मारहाणीत जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अरबाज बशीर शेख (वय-22, रा. गहुंजे गावठाण, ता. मावळ), अभिजीत अर्जुन सुरवसे (रा. गहुंजे), नितीन रामभाऊ आवताडे (रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.