पिंपरी – बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 3 लाख 18 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. 25 मे रोजी सकाळी 11 ते 26 मे सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास पिंपरी येथील बौध्दनगर परिसरात घडली. याप्रकरणी भुजंग रंगनाथ गायकवाड (वय-59) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भुजंग घर बंद करुन बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील 1 लाख 18 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व 2 लाख रुपये रोख रक्कम असा एकूण 3 लाख 18 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. दि. 26 मे रोजी भुजंग गायकवाड घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. याबाबत अधिक तपास पिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.