घरात घुसून विनयभंग करणाऱ्यास चोप

पिंपरी -अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून विनयभंग करणाऱ्या तरुणाला घरातील लोकांनी चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. हा प्रकार एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी पहाटे घडला. संग्राम मच्छिंद्र गायकर (वय-25 रा.भोसरी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शनिवारी पहाटे अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून जबरदस्ती करु लागला, मुलीने आरडा-ओरडा केल्याने मुलीचे काका उठले. संग्राम गायकरने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु मुलीच्या काकाने पाठलाग करुन त्याला पकडले. संग्रामला चांगलाच चोप दिल्यानंतर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी त्याला अटक करुन पुढील तपास सुरू केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.