तरुणीशी गैरवर्तन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

पिंपरी -तरुणीशी गैरवर्तन करणाऱ्या दोन तरुणांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीने फिर्याद दिली असून अंकुश रामचरित्र पांडे (वय-25 रा. पुणे) व अभिषेक रामचरित्र पांडे (वय-25 रा. पुणे) अशी आरोपींची नावे असून अभिषेक याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश याने पीडितेला आम्हाला कशाला नादाला लावते म्हणून हात धरुन घरी नेण्याची जबरदस्ती केली तर अभिषेक याने अश्‍लील बोलत पीडित तरुणीचा विनयभंग केला. यावरून पोलिसांनी अभिषेकला अटक केली असून दोघांवरही विनयभंगाचा गुन्हा दाखल केल आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.