बलात्काराची तक्रार देण्याची धमकी; ‘ब्लॅकमेलर’ अटकेत

पिंपरी – बलात्कार केल्याचा तक्रार पोलिसांमध्ये देईन अशी धमकी देत तरुणाला तब्बल चार लाख रुपयांना लुटल्याची घटना चिखली येथे घडली आहे. या प्रकऱणी चिखली पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली आहे. पीडित तरुणाच्या पत्नीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोनिया उद्देश मेहरा (वय 22, रा. विश्रांतवाडी, पुणे) असे अटक मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोनिया हिने फेसबूकच्या माध्यमातून फिर्यादी यांच्या पतीला आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. माझी परिस्थिती बेताची आहे, वडील नाहीत अस म्हणत सहानुभूती मिळवली. मला नोकरीची गरज आहे, मला नोकरी मिळवून द्या असे म्हणून जवळीक साधली.

पीडित तरुणांकडे पैसे मागितले त्यांनी देखील डोळे झाकून हवी ती रक्कम दिली. ते पैसे आरोपी सोनियाने परत केल्याने तिच्यावर पीडित तरुणाचा विश्‍वास बसला. असे त्यांच्यात अनेकदा पैशांचे व्यवहार झाले. तिने एके दिवशी पीडित तरुणाला भेटण्याच्या बहाण्याने हॉटेलवर बोलवत शारिरीक संबंध प्रस्थापित केले, त्याचे न कळत फोटो घेतले आणि काही दिवसांनी धमकी देण्यास सुरुवात झाली.

पीडित तरुणांकडून वेळोवेळी तब्बल चार लाख रुपये, तर वाढदिवसाला दुचाकी गिफ्ट म्हणून घेतली. बलात्कार केल्याची ती धमकी देत असल्याने तरुण हतबल झाला होता. पत्नीला सांगून तुझी पोलखोल करते असे देखील ती म्हणत होती. त्यामुळे अखेर कंटाळून तरुणाने मोबाईल बंद ठेवला, तेव्हा फिर्यादी पत्नीच्या नंबरवर फोन आला आणि सर्व घटना समोर आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.