शटर उचकटून साठ हजारांची चोरी

पिंपरी – शटर उचकटून चोरट्यांनी वाईन शॉपमधील साठ हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 14 ) पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी शाम ठाकूरदास जगवाणी (39, रा. कोरेगाव पार्क, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शाम यांचे बावधन खुर्द येथे एलोरा वाईन्स नावाने दुकान आहे. रविवारी रात्री दुकान कुलूप लावून बंद असताना चोरट्यांनी अज्ञात साहित्याचा वापर करून शटर उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी गल्ल्यातील 60 हजारांची रोकड चोरून नेली. तसेच चोरट्यांनी शाम यांच्या दुकानासमोर राहणाऱ्या सुलोचना कारंजावणे यांच्या घराचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त झिनिया सोसायटी येथील एसीपीएल ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमध्ये देखील चोरी झाली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.