पिंपरी -दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 17 ) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली.
या प्रकरणी रमेश भुजंग गायकवाड (53, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गायकवाड यांचे घर 13 ते 17 एप्रिल दरम्यान कुलूप लावून बंद होते. या दरम्यान चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. गायकवाड यांनी कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. पुढील तपास चिखली पोलिस करीत आहेत.