पूर्व वैमन्यस्यातून तरुणावर वार

पिंपरी – पूर्ववैमनस्यातून टोळक्‍याने तरुणावर कोयत्याने वार केले. रविवारी (दि.14) पहाटे साडे बाराच्या सुमारास निगडीतील बीआरटी बस स्थानकाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी सागर बासुराज पवार (वय-27, रा.ओटा स्कीम, निगडी) याने फिर्याद दिली असून दाद्या गवळी, छोट्या मगर, शाहरुख शेख, डॅन्या यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर व त्याच्या मित्र रविवारी पहाटे निगडी परिसरातून दुचाकीवर जात होते. त्यावेळी पूर्वीच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी त्यांना निगडी बीआरटी बस स्थानकाजवळ अडवले. लाथाबुक्क्‌यांनी मारहाण केली. तसेच सागर याच्या मित्रावर कोयत्याने वार करून पळ काढला. यामध्ये दोघे जखमी झाले असून पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.