पिंपरी : निगडीत कपड्याच्या दुकानात चोरी

पिंपरी – दुकानाचे शटर उचकटून चोरटयांनी 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. रविवारी (दि.14) पहाटे पाचच्या सुमारास निगडीतील डिलक्‍स फॅशन दुकानात हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जोगराज लिखमसिंग राजपुरोहित (वय-22, रा.आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात चोरट्यांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजपुरोहित यांनी शनिवारी रात्री त्यांचे दुकान नेहमीप्रमाणे बंद केले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शटर हाताने उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील 50 हजार रोख आणि 10 हजार रुपयांची सोन्याची अंगठी असा 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे अधिक तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.