कॅब चालकाला फिल्मी स्टाईलने लुटले

पिंपरी – तोंडाला रुमाल बांधून चाकूचा धाक दाखवत एखाद्या फिल्मी स्टाईलमध्ये दोघांनी एकाचे सहा लाख रुपये लुटले. ही घटना शुक्रवारी (दि.12) पहाटे घडली. दीपक राजाराम इंगळे (वय-39 रा. मांजरी, पुणे) यांनी फिर्याद दिली असून दोन अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक यांनी उबर कंपनीत कॅब व्यवसायासाठी लावली होती. ते व्यवसायासाठी म्हाळुंगे येथे थांबले असताना तोंडाला रुमाल बांधलेले दोन इसम तेथे आले व त्यांनी चाकूचा धाक दाखवत दीपक यांची कार, मोबाईल असा सहा लाख 4 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी हिंडवडी पोलीस पुढील तपास करायचा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.