पिंपरी – गाडीला कट मारला म्हणून तिघांनी दुचाकी चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना चिखली येथे घडली आहे. वसीम सलीम शेख (वय-34 रा.चिखली) यांनी फिर्याद दिली असून तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरून घरी जात असताना त्यांच्या गाडीचा कट आरोपीच्या गाडीला लागला. यातून झालेल्या वादातून तिघांनी लाकडी दांडक्याने व फोर्क चमच्याने फिर्यादी यांना मारहाण केली.