पिंपरी : तरुणीची 1 लाख 57 हजारांची फसवणूक

पिंपरी – गुंतवणूक केल्यास जास्त परताव्याचे आमिष दाखवून तरुणीची दिड लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बुधवार दि. 10 एप्रिल रोजी भोसरी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, भोसरी येथील ऐश्‍वर्या किरण चावरे (वय-23) यांना पिंपळे सौदागर येथील अंकित वानखेडे, गणेश ढोमसे, शर्वरी मालुष्ठ यांनी संगनमत करुन क्‍युनेट कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले. यावर विश्‍वास ठेवत तरुणीने नोव्हेंबर 2018 पासून या कंपनीमध्ये गुंतवणुक करण्यास सुरवात केली. तिने एकूण 1 लाख 57 हजार रुपयाची गुंतवणूक केली. तरुणीने आपल्या गुंतवणुकीचा परतावा मागितल्यानंतर तिला कोणताही परतावा देण्यात आला नाही. शिवाय कंपनीचे प्रॉडक्‍टही दिले नाहीत.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने भोसरी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गाढवे करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.