पिंपरी – जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी एका तरुणाला मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.6) रात्री साडे दहाच्या सुमारास चिंचवड येथे घडली. याप्रकरणी उमेश रमेश घाडगे (वय-23 रा.निगडी ओटास्कीम) यांनी फिर्याद दिली असून शाहिद शेख, सुरज चंदनशिवे, मोहम्मद कोरुब (सर्व राहणार ओटास्कीम) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी उमेश याला चामडी पट्टा व दगाडाने मारहाण केली. यामध्ये उमेश जखमी झाला आहे. त्यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे.